Friday, April 17, 2026
Homeजळगावब्रेकिंग - भुसावळ न.पा.चा ५१ लाख ६२ हजार अपंगाचा निधी त्यांच्या खात्यात आज...

ब्रेकिंग – भुसावळ न.पा.चा ५१ लाख ६२ हजार अपंगाचा निधी त्यांच्या खात्यात आज जमा होणार .

ब्रेकिंग : भुसावळ न.पा.चा ५१ लाख ६२ हजार अपंगाचा निधी त्यांच्या खात्यात आज जमा होणार!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला अपंग कल्याण निधी अखेर आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती भुसावळ नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य संतोष चौधरी यांनी दिली आहे.
या अंतर्गत शहरातील सुमारे ९७५ अपंग बांधव-भगिनींना एकूण ५१ लाख ६२ हजार रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. निधी लांबणीवर पडल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती, मात्र आज तो जमा होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, नगरसेवक उल्हास पगारे, सचिन चौधरी तसेच त्यांच्या टीमकडून या कामासाठी करण्यात आलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही संतोष चौधरी यांनी नमूद केले.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपंग बांधवांनी निधी मिळावा यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर शासनाकडून निधी वितरणाचे आदेश मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, निधीवाटपात अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या