Sunday, February 15, 2026
Homeजळगावयेथे संत सेवालाल महाराज जयंती व भक्तीसभा उत्साहात

येथे संत सेवालाल महाराज जयंती व भक्तीसभा उत्साहात

येथे संत सेवालाल महाराज जयंती व भक्तीसभा उत्साहात
आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती

रावेर :    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती व सातपुड्यातून ज्ञानाची गंगा प्रगट करणारे परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या संकल्पनाने आणि विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समिती आयोजित भक्ती सभा तसेच महाशिवरात्री पर्व बंजारा बांधव तसेच भाविक भक्तांतून या त्रिवेणी अध्यात्मिक महोत्सवाचे रावेर येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण

 

वातावरणात संपन्न झाले . सकाळपासूनच शहरात दहा वाजेपासून याचे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणुकीची सुरुवात दुपारी बारा वाजता पाराचा गणपती येथून करण्यात आली. त्यानंतर डॉ. हेडगेवार चौक, लक्ष्मी मंदिर, बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे कमलाबाई गर्ल्स हायस्कूल सभागृह येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत बंजारा पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य बापूंजीचे शिष्य संत श्री नवनीत चैतन्य महाराज होते. यावेळी आमदार अमोल जावळे, लोकनियुक्त नगराध्यक्षा

 

संगीताताई महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, शीतल पाटील, भास्कर महाजन पहलवान, अरुण शिंदे, दुर्गादास पाटील (भाजपा तालुका अध्यक्ष), अॅड. सूर्यकांत देशमुख, रविंद्र पाटील, वासुदेव नरवाडे,डॉ संदीप पाटील, ह भ प कांतीलाल महाराज,राजू सवर्णे, डी डी वाणी,आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम सभागृहात बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज व आराध्य दैवत परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्यान,प्रार्थना व गीतेचे श्लोक पठन करण्यात आले. त्या नंतर

 

मान्यवरचे सत्कार करून श्रद्धावचन व मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच संत श्री सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र, त्याची शिकवण व परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चे अध्यात्मतून समाजाला दिलेले उपदेश आणि भक्ती सभेचे महत्व संत श्री नवनीत चैतन्य जी महाराज यांनी सत्संगातून व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी बंजारा समाजाच्या कार्यात सदैव पाठीशी राहून त्यांच्या अडीअडचणी चे प्रश्न मार्गी लावण्याकरिता आम्ही सदैव तत्पर राहू असे मनोगत व्यक्त केले.तसेच मान्यवरांनी संत सेवालाल महाराज व संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या विचारांचे स्मरण करून समाज एकजूट, शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला रावेर तालुक्यातील बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे नियोजन संत सेवालाल महाराज उत्सव समिती आणि चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितीच्या वतीने करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या