मासिक हप्ता घेऊन वाळूचा ट्रक पकडल्याने महसूल कर्मचाऱ्यांनाच् स्वतःच्या खिशातून भरावी लागली दंडाची रक्कम !
कर्मचाऱ्यांची आप- आपसात धुसपुस!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – ठरल्याप्रमाणे एका अवैध वाळू वाहतूक दाराकडून मासिक हप्ता घेतलेला असताना त्या अवैध वाळू वाहतूकदाराचा ट्रक महसूल मधील तीन चार संबंधित कर्मचाऱ्यांनी पकडल्याने त्या अवैध वाळू वाहतूकदारावर दंडात्मक कारवाई झाली.ट्रक चालकाने ती दंडाची रक्कम ज्या महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूचा ट्रक पकडला होता त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या त्यांच्याकडून रोख रक्कम घेऊन भरल्याने त्या महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आप- आपसात मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याची भुसावळ विभागात जोरदार चर्चा आहे.
भुसावळ महसूल कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे अनेक वाहने आहेत. यातील अनेक व वाहनधारकांकडून संबंधितांकडून दरमहा नियमित हप्ते गोळा केले जातात यापैकी जो अवैध गौण खनिज धारक नियमित वेळेवर हप्ता देत नाही त्याचे अवैध गौण खनिजाचे वाहन पकडले जाते. ही वस्तुस्थिती आहे.परंतु अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका वाहन धारकाकडून मासिक हप्ता घेतल्यानंतर महसूल मधील दुसऱ्या दोन-तीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत गेल्या काही महिन्यापूर्वी लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला सोबत घेऊन हप्ता दिलेले वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने महसूल मध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्या लाचखोर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असताना त्यांना सोबत कोणत्या नियमानुसार.,? कोणाच्या आदेशानुसार घेतले ? याबाबत संपूर्ण भुसावळ महसूल क्षेत्रात चर्चा सुरू आहे.