Wednesday, February 18, 2026
Homeजळगाव108 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे, पाल येथे संत गोपाल चैतन्य...

108 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे, पाल येथे संत गोपाल चैतन्य महाराज यांचे भव्य स्वागत

108 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे,
पाल येथे संत गोपाल चैतन्य महाराज यांचे भव्य स्वागत
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                पाल ता रावेर :- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी 108 चैतन्य साधक परिवारासह फक्त 108 दिवसातच 3500 की. मी अंतराची पैदल माँ नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याने देशभरातील भाविकामध्ये त्यांचे कौतुक करण्यात येत असून ही परिक्रमा निर्विघ्न पार पाडून दि :-17 फेब्रुवारी रोजी पाल येथील त्यांच्या श्री वृंदावन धाम आश्रमात

 

आले असता त्यांचे चैतन्य युवा उत्सव समिती पाल तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी श्रधेय बाबाजीचे दर्शन घेण्याकरिता रावेर तालुक्यासह हजारो चैतन्य साधक व भाविक भक्त उपस्थित होते.
सायकाळी पाच वाजेला श्रधेय बाबाजीचे आगमन झाले असता पाल हुन दोन किलोमीटर अंतरावर शेरीनाका जवळून श्री हरीनाम संकीर्तनाने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. त्यानंतर पाल आश्रमात स्थित श्री हरिधाम मंदिरात विराजित परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजींच्या समाधी स्थळी दर्शन घेऊन व्यासपीठावर येताच चैतन्य साधक व भाविक भक्तांकडून श्रधेय बाबाजींचे पुष्पहारासह भव्य स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना श्रद्येय बाबाजी यांनी माँ नर्मदा परिक्रमा करीत असतांना सिद्ध महापुरुषांचे दर्शन तसेच हरीनाम संकीर्तननाने सूरू असलेल्या या माँ नर्मदा परिक्रमेत वेळोवेळी विविध दैवी अनुभव घडले त्यांचे सविस्तर वृत्त उपस्थित चैतन्य

 

साधक भक्तांना सांगितले. या महोत्सवी गोविंद पवार व राधे पवार यांच्या तर्फे महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला. यावेळी श्री योगी जी महाराज, श्री श्याम चैतन्य जी महाराज, श्री दिव्य चैतन्य जी महाराज, श्री शिव चैतन्य जी महाराज, श्री नवनीत चैतन्य जी महाराज, श्री हरीश चैतन्य जी महाराज, श्री ऋषीं चैतन्य जी महाराज,शुभ चैतन्य महाराज,श्री राम चैतन्य महाराज, श्री ललित चैतन्य महाराज सह हजारो चैतन्य साधक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या