भुसावळ विद्युत लोको शेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
प्रसंगी चाणक्य जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार व त्यांच्या शौर्या बद्दल विचार व्यक्त केले.
त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी सैन्य, कमी शस्त्र असून सुद्धा युक्तीचा वापर करून स्वराज निर्माण केले त्या प्रमाणे आपल्याला सुद्धा रेल्वे ला पुढे घेऊन जायचे आहे.
या वेळी ललित भारंबे,निलेश इंगळे,सुशील पगारे,राजीव कुमार सिंग,जयेश ढाकणे,राहुल राजपूत,ललित मुथा,योगेश माळी,संजय चौधरी,मोहन राजपूत,शैलेश पाटिल,विशाल सपकाळे,चेतन तायडे, रंजित चौधरी,भूपेश घोलप,नागसेन यशोदे,विजय पाटिल यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

