Friday, February 20, 2026
Homeजळगावआज भुसावळ शहरात प्रथमच दोन दिवशीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन.

आज भुसावळ शहरात प्रथमच दोन दिवशीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन.

आज भुसावळ शहरात प्रथमच दोन दिवशीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन.

भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने समाज बांधवांनी जास्त जास्त लाभ घेण्याचे आवाहन.

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   (वा) भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने शहरात प्रथमच भिक्खुणी संघ धम्म परिषद शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील कृष्णचंद्र सभागृह रेल्वे स्टेशन जवळ भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या दोन दिवशीय धम्म परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य. भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना आहेत. त्या बोधिपक्खिय धम्म फाउंडेशनच्या फाउंडर , आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅटिंग सेरेमनी कोषाध्यक्ष बोधगया तसेच अभिधम्मपिटक अभ्यासिका आणि शिक्षिका असुन गोल्ड मेडेलिस्ट आहेत.
या दोन दिवशीय समाज बांधवांना विशेष धम्मदेसना देण्यासाठी पुज्य नागकन्या थेरी अय्याजी , पुज्य. विनय शिला थेरी अय्याजी , पुज्य. उप्पलवना थेरी अय्याजी , पुज्य. सुजाता थेरी अय्याजी, पुज्य. शर्मनेरी रुपासरी, पुज्य कुंडलकेशा अय्याजी यांच्या भिक्खुणी संघाचे प्रवचन लाभणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमराव साळुंके सुरेश पहेलवान यशोदे सुरेंद्र रामटेके सुधाकर सोनवणे अशोक शिंदे दिपक नन्नवरे विशाल सोयंके राहुल कुचेकर संदेश शिंदे गजानन निंबाळकर महेश सपकाळे पत्रकार सुनील आराक सचिन गायकवाड धम्मीका इंगळे अजय इंगळे यांच्या सह समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या