Monday, July 6, 2026
Homeगुन्हाखळबळ - न्यायालय परिसरात वकीलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला !

खळबळ – न्यायालय परिसरात वकीलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला !

खळबळ – न्यायालय परिसरात वकीलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला !

Oplus_131072

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील न्यायालय परिसरात दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर बापजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण हे प्लॉट व्यवहाराशी संबंधित असून सुमारे ३ लाख रुपये टोकन रक्कम देण्यात आली होती. तर, पुढील खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर थेट न्यायालय परिसरातच ५ ते ६ जणांनी अॅड. समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती. तर वकिलांनी तीव्र संताप व्यक्त करत न्यायालय परिसरातच सुरक्षितता नसेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या