Sunday, February 22, 2026
Homeगुन्हातरुणास दगड मारून केले जखमी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणास दगड मारून केले जखमी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणास दगड मारून केले जखमी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव : शहरातील सम्राटनगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे एका संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर अनिल देशमुख (वय २८, रा. सम्राटनगर, भडगाव रोड, चाळीसगाव) हे २० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर फिरत होते. त्यावेळी यश उर्फ बाळा सोमनाथ बडनेरे (रा. खरजई रोड, चाळीसगाव) हा तेथे येऊन “कामावर का येत नाहीस” या कारणावरून वाद घालू लागला. वाद विकोपाला गेल्याने संबंधिताने शिवीगाळ करत खाली पडलेला दगड उचलून सागर देशमुख यांच्या कपाळावर मारला. या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. आरडाओरडा ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी तेथून पळून गेला.जखमी देशमुख यांना नातेवाईक व मित्रांच्या मदतीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. चाळीसगाव पोलिसांनी संबंधिताविरुद्ध दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे . या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या