सकल बंजारा समाज आयोजित
क्रिकेट लीगचा जल्लोष
I जळगांव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये सकल बंजारा समाजातर्फे आयोजित बंजारा क्रिकेट लीगचा उत्साहात समारोप करण्यात आला. या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विजेत्या टीमला पारितोषीक प्रदान करण्यात आले .
संत सेवालाल जयंती उत्सवापासुन सुरू झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत पहिले पारितोषीक ५१ हजार, दुसरे ३१ हजार तर तिसरे पारितोषीक २१ हजार रूपयांचे होते. या सामन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमधून असंख्य क्रिकेट संघांनी सहभाग घेत कामगिरी दाखविली. मांडवेदिगर (ता.भुसावळ ) येथील नवदुर्गा मित्र मंडळ संघाने प्रथम पारितोषीक पटकावले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात दरबारसिंग राठोड, मदन जाधव, अरविंद चितोडिया, सुमित जोशी, विठ्ठल जाधव, चेतन चव्हाण, अविनाश चव्हाण, रमेश नाईक, ईश्वरसिंग राठोड यांनी योगदान दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

