तोल काटा,ट्रक चालक आणि केळी व्यापारी यांनी संगनमताने ३० क्विंटल केळी वजन कमी दाखवून शेतकऱ्याच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रयत्न केला.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२५ तालुक्यात एका तोल काट्यावर केळीने भरलेला ट्रक मोजताना तोल काटा,ट्रक चालक आणि संबंधित केळी व्यापारी यांनी संगनमत करून ३० क्विंटल केळी ( अंदाजे ५५ ते ६० हजार रुपये किमतीची ) वजन कमी दाखवून शेतकऱ्याच्या टाळू वरील लोणी खाऊन आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने तसेच सांगवी बु. विकास सोसायटीकडे तक्रार दिल्याने विकास सोसायटीने योग्य त्या कार्यवाहीसाठी यावल पोलिसात लेखी तक्रार दिल्याचे समजले असले तरी तालुक्यातील शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली असून याबाबत राजकीय, सामाजिक,शासकीय स्तरावरून पुढील कार्यवाही काही होणार किंवा नाही..? याबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सांगवी बुद्रुक परिसरातील गणेश तोल काट्यावर वजनामध्ये तफावत असल्याचा आरोप करून संबंधित एका शेतकरी बांधवाने विविध कार्यकारी सोसायटीकडे तक्रार केली आहे.तोल काट्यावर चुकीचे वजन माप दाखविल्यामुळे अंदाजे ४५ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा संशय व्यक्त करत शेतकऱ्यांनी सदर तोल काटा तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात दि.२५ फेब्रुवारी २०२६ सांगवी बुद्रुक येथील पीक संरक्षण संस्था कार्यालयात आयोजित संचालकांच्या बैठकीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकमुखी ठराव मंजूर करून वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिला.
उपसरपंच विकास धांडे यांनी चुकीच्या वजन मापामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करताना संबंधित यंत्रणा म्हणजे काही ठराविक व्यापारी आणि तोल काटा चालक,तोल काट्यावर रिकाम्या ट्रकचे वजन करताना आणि ट्रक मध्ये शेती उत्पादित माल भरल्यानंतर वजनाच्या मापात त पाप करून वजन कमी दाखवून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप करत टोल काटा त्वरित बंद करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. पुढील कार्यवाही आणि कारवाई काय होते.? याकडे परिसरातील नागरिक व शेतकरी यांचे लक्ष लागून आहे.
तोल काट्यावर खेळणी भरलेल्या ट्रकच्या वजनात तफावत असल्याने संबंधित तोल काट्याचे ऑडिट व नियमित तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली आहे किंवा नाही ? याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून आणि शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या क्षेत्रातून करण्यात आली आहे.
तालुक्यातील त्या तोल काटा चालक, मालकाचे अनेक रंगेल किस्से सुद्धा तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे.

