पाल वृंदावन धामात दोन मार्च ला होळी महोत्सव
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पाल ता रावेर :-अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक सदगुरु परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी श्री वृंदावन धाम पाल यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या होळी महोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही दि २ मार्च रोजी पाल आश्रमात फाल्गुनी पौर्णिमा चे औचित्य साधून विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात साजरा करण्यात येणार असून तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे.
ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या सानिध्यात आज पावेतो पंचवीस वर्षांपासून या होळी महोत्सवाची परंपरा सुरु असून कालांतराने जेव्हा २००९ साली पूज्य बापूजी ब्राम्हलींनात समाधीस्त झाले होते त्यावेळी संपूर्ण चैतन्य साधक परिवारावर शोककळा पसरली असता तीन ते चार वर्ष या होळी महोत्सवाला स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर भक्तांच्या
आग्रहाखातीर पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात हा महोत्सव पुन्हा सुरु करण्यात आले. या आधी तीन दिवसीय होळी महोत्सव शिबिराच्या दृष्टीने सुरु होते. परंतु शिबीर न करता एक दिवसीय महोत्सव साजरा करण्यात येत असून या होळी महोत्सवात फुलाची, कोरड्या रंगांची, आणि रंगारंग होळी महोत्सव साजरा करण्यात येते. ज्या प्रमाणे वृंदावन आणि बरसाना मध्ये होळी महोत्सव साजरा केला जातो त्याचीच प्रतिकृती पाल वृंदावन धाम आश्रमात पहावयास मिळते म्हणून ही अनोखी, अद्भुत होळी महोत्सव चा आनंद घेण्याकरिता देशभरातून हजारो भाविक पाल आश्रमात येतात.

