Saturday, February 28, 2026
Homeजळगावआमदार निधीमधील अडीच कोटींच्या कामे प्रतिक्षेतच

आमदार निधीमधील अडीच कोटींच्या कामे प्रतिक्षेतच

आमदार निधीमधील अडीच कोटींच्या कामे प्रतिक्षेतच

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी विरोध केलेले १७७ विषय नामंजूर करावे, त्याची नोंद प्रोसिडिंगमध्ये करावी, अमृत योजनेतून रखडलेल्या जलकुंभाच्या कामाला गती द्यावी, आमदार निधीतून मंजूरी मिळालेल्या अडीच कोटींच्या विकास कामांना पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे या मागण्यांसाठी शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांची भेट घेतली .

काही दिवसांपासून रजेवर असलेले मुख्याधिकारी राजेंद्र फातले पुन्हा पालिकेत हजर झाले आहे. त्यानंतर भाजपचे गटनेते युवराज लोणारी व नगरसेवकांनी त्यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. मुख्याधिकारी विवेक, धांडे यांच्या प्रभारी काळात व पालिकेची सर्वसाधारण सभा न झाली होती. या सभेत २५० विषय अजेंड्यावर होते. मात्र, भाजप, व शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ३३ नगरसेवकांनी १७७विषयांना विरोध दर्शवला होता.

बंधाऱ्याच्या कामाची पाहणीः पालिकेने शहराला पाणीपुरवठ करणाऱ्या बंधाऱ्याची डागडुजी केली आहे. या कामाचीही नगरसेवकांनी पाहणी केली. शहराला आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याबाबतचा आढावा घेतला. यापूर्वी झालेला बंधारा सुस्थितीत असून आता केवळ ५० मीटर अंतराचे बांधकामकेल्याची माहिती लोणारी यांनी दिली.

दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी या विषयांना आवाजी मंजुरी दिली होती. बहुमतामुळे हे विषय नामंजूर करावे, तशी नोंद प्रोसिडिंगमध्ये घ्यावी. सत्ताधारी हे विषय मंजूर करत असतील तर मुख्याधिकाऱ्यांनी कलम ३०८ प्रमाणे हे विषय नामंजूर करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. भुसावळ शहरासाठी आमदार निधीतून अडीच कोटींची कामे होणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये अडथळा न आणता या ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. या वेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, निर्मल कोठारी, गिरीश महाजन, किरण कोलते, परीक्षित बहहाटे, विशाल नाटकर, आशिष पटेल, सुजीत भोळे आर्दीसह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या