एकनाथ खडसेंच्या विधान परिषदेतील प्रश्ना नंतर पोलीस दल एक्शन मोडवर
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आ एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वाळू वाहतूक प्रश्न उपस्थित केला असता जळगाव पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७/०२/२०२६ रोजी पहाटे ०५.०० वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी ही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.जळगाव उपविभागांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली आहे . या मोहिमेत जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाहीचे नेतृत्व केले या मोहिमेमध्ये जळगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांभोरी, टाकरखेडे, खेडी व लगतच्या परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण ९० वाहनांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम २०७अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
- जळगाव तालुका पोलीस स्टेशनः ३२ ट्रॅक्टर आणि ०८ डंपर (एकूण ४० वाहने),
- कासोदा पोलीस स्टेशनः १५ ट्रॅक्टर,
- भडगाव पोलीस स्टेशनः १३ ट्रॅक्टर आणि ०१ डंपर,
- एरंडोल पोलीस स्टेशनः ०४ ट्रॅक्टर आणि ०१ डंपर.
- मेहुणबारे पोलीस स्टेशनः या ठिकाणी १५ ट्रैक्टर आणि ०१ वाळूने भरलेला ट्रैक्टर मिळून आला.
याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.अवैध वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून संबंधित कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत खालील बाबींची पडताळणी करण्यात

