नगरपरिषदेचा तब्बल २७४ कोटीचे अर्थसंकल्प सादर, सव्वा कोटीचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२८
नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच २७४ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प लोकनियुक्त नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांच्या आणि यावल नगरपरिषद नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.
जनतेचे हित लक्षात घेता कोणत्याही प्रकारचे कर वाढ नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
शनिवारी दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोट्यावधी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असुन या अर्थसंकल्पात कोट्यावधीच्या विविध विकास कामांचा समावेश आहे.तर हा अर्थसंकल्प तब्बल एक कोटी २९ लाख ५९ हजार ४१० रुपयाचा शिलकी असून या अर्थसंकल्पात प्रपत्र ६ जोडून सदर निधी कोणत्या कामात किती प्रमाणात खर्च होईल याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली आहे. प्रामुख्याने यात नगरपरिषदच्या मालकीच्या क्रीडांगणासाठी ४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर शहराच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून देखील निधीची तरतूद केली गेली आहे.
यावल येथील नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील,उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकुब यांच्या वतीने आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात तब्बल २७४ कोटी रुपयाचे हे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. दरम्यान अर्थसंकल्प सादर करताना प्र पत्र ६ नसल्याची व सदर मोघम स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी नगराध्यक्ष व सभागृहाला सांगितले.तेव्हा प्रपत्र ६ हे तात्काळ तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर कशा पद्धतीने २७४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल आणि तो कुठे आणि कसा खर्च होईल हे प्रपत्र ६ नुसार सभागृहात सादर करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.या सभेत काँग्रेसच्या गटनेता कमरुन्निसाबी सैफुद्दीन,भाजपाच्या गटनेता नंदा महाजन,शिवसेना उबाठा गटनेता सागर चौधरी, राष्ट्रवादी अजीत पवार गटाच्या गटनेता वर्षा चोपडे सह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांची उपस्थिती होती. तर या सभेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर यात खर्च हा २७२ कोटी ७९ लाख ८४ हजार ८५२ अपेक्षित असून हा अर्थसंकल्प १ कोटी २९ लाख ५९ हजार ४१० रूपये शिलकी असल्याचे अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील —
सन २०२१ मध्ये यावल नगरपालिकेने सीडीपी तयार केला होता त्यात विविध विकास कामे घेण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज महानगरोथान योजनेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची कामे करणे शक्य होईल.पूर्वी नियोजन करून या योजना प्रस्तावित केल्या होत्या त्यात आज शेळगाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे व भविष्यात शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून त्यासाठीच अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. विकास आराखड्यातील आरक्षण असलेली क्रीडांगणाची जागा विकसित केली जाणार आहे, पुरातन वास्तू संवर्धन योजनेतून यावलचे वैभव असलेला किल्ला सुशोभीकरण करण्यात येणार असून विस्तारीत भागात रस्ते करण्यात येणार आहे. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून भविष्यात यावल शहराला विकासाची दिशा मिळवून देईल असे मत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

