Wednesday, August 26, 2026
Homeजळगावजळगावमध्ये महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेक दिनी दुग्धाभिषेक सोहळा   

जळगावमध्ये महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेक दिनी दुग्धाभिषेक सोहळा   

जळगावमध्ये महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेक दिनी दुग्धाभिषेक सोहळा                                       जळगाव खान्देश लाईव्ह न्युज हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जळगाव जिल्हा टीमने दुग्धाभिषेक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित केला. हा सोहळा महाराणा प्रतापसिंहांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन करणी सेनेचे जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ राजपूत यांच्या पुढाकाराने झाले. यावेळी पुतळ्याचा विधिवत दुग्धाभिषेक, पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी ‘जय महाराणा प्रताप!’सह देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.प्रमुख पाहुणे म्हणून

 

 

Oplus_131072

जळगाव महापालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे, करणी सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सारिकाताई पाटील, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक ॲड. सुचिता हाडा, नरेंद्रसिंह पाटील, माजी नगरसेवक अतुलसिंह हाडा, पिंटूभाऊ काळे, ॲड. देवीसिंह पाटील, करणी सेनेचे कार्याध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, खानदेश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष किरण राजपूत, भगवान खंडाळकर, विठ्ठलसिंह राजपूत, रतनसिह परदेशी, बोधराज राजपूत, चंद्रशेखर राजपूत, संजना राजपूत, रोशन राजपूत उपस्थित होते.महापौर दीपमाला काळे यांनी मनोगतात महाराणा प्रतापांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचे स्मरण करत समाजाने त्यांचे आदर्श अवलंबावेत, असे आवाहन केले. राजपूत समाजातील बांधव आणि महिलांची मोठ्या संख्येने हजेरी लाभली. कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या