पोलीस वसाहतीमध्ये गैरसोय सभापती शोभाताई इंगळे यांनी नगरपालिकेत विचारला प्रश्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ नगरपरिषद च्या सभे मध्ये मा. सभापती शोभा ताई इंगळे यांनी पोलीस वसाहत मधील अपुऱ्या सुविधा व पोलीस बांधव व त्यांचा परिवार सहन करत असलेल्या यातना यांना वाचा फोडली व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते. पोलीस बंधु सर्व नागरिकांचे सण उत्सव इमानदारीने बंदोबस्त राखून स्वतः परिवारा पासून लांब राहून नागरिकांचे उत्सव सुखरूप पणे पार पडतात
नगरपालिकेचा कर भारतात मग त्यांना नागरी सुविधा का नको
एक लाईट सुद्धा चालू नाही आहे ही शोकांतिका आहे .
रात्री अपरात्री ड्युटी करून थकून भागून आलेले माझे पोलीस बांधव अंधारात वसाहतीत सर्प व इतर विषारी जनावरे यांचा सामना करतात अशात जर काही अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण
लवकरात लवकर पोलीस वसाहतीत सुविधा पूर्वाव्यात अन्यथा आम्ही सर्व तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू असा इशारा सभापती यांनी आज नगराधक्षा व नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी यांना देण्यात आला.

