Wednesday, March 4, 2026
Homeजळगाव४१ वर्षानंतर फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

४१ वर्षानंतर फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

४१ वर्षानंतर फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूरचे इयत्ता १० वी चे माजी विद्यार्थी ( १९८४-८५ ) ची बॅच यांचा ४१ वर्षानंतर स्नेहमेळावा (गेटटुगेदर) वयाचे ५५ वर्षावरील विद्यार्थ्यांनी १ मार्च रोजी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या गेटटुगेदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्याच बॅच चे माजी विद्यार्थी श्री. मिलिंद (बापू) वाघुळदे होते. या कार्यक्रमात त्या वेळेचे माजी शिक्षक आज सुमारे ८० वय वर्ष असणारे उपस्थित होते. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने माजी मुख्याध्यापक श्री. पी.एस.चौधरी, माजी शिक्षक श्री.पी.जे.राजपूत, श्री.एम.एच.वराडे, श्री.ऐन.एन.चौधरी, श्री.सी.डी.चौधरी, श्री.ए.ई.ठोंबरे, श्री.बी.जी.चौधरी, श्री.सी.के.चौधरी, श्री.एच.सी.किरंगे, श्री.डी.के.भंगाळे, श्रीमती.विजया चौधरी, श्रीमती. शकुंतला सराफ, सौ.वराडे मॅडम, ग्रंथपाल श्री.एन.एन.नारखेडे, शिपाई श्री.ईच्छाराम नारखेडे, श्री.रशीद तडवी, शाळेचे प्र.मुख्याध्यापक श्री.के.टी.तळेले यांचेसह जवळपास ७० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात शाळेची गजर देऊन शाळा भरविण्यात आली. प्रथम राष्ट्रगीत नंतर जे दिवंगत झाले असे माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात माजी तीन – चार विद्यार्थी आणि दोन शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मिलिंद वाघुळदे यांनी आपला त्याकाळचा अनुभव सांगितला. आम्ही जे काही आज आहोत ते याच शिक्षकांनी आम्हाला घडवले. यांनीच आम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून आम्ही आमच्या जीवनात यशस्वी झालो. सुत्रसंचलन व प्रस्तावना संजय सराफ सर यांनी केली. प्रस्तावनात थोडक्यात शाळेची त्याकाळची व आजची माहीती त्यांनी दिली. आभार सुक्षमा तायडे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या