Wednesday, March 4, 2026
Homeजळगावगोवंश तस्करीच्या संशयावरून मध्यरात्री थरार; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी!

गोवंश तस्करीच्या संशयावरून मध्यरात्री थरार; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी!

गोवंश तस्करीच्या संशयावरून मध्यरात्री थरार; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरात गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनावरून बुधवारी (४ मार्च) पहाटे मोठा राडा झाला. जळगावमधील मास्टर कॉलनी परिसरात झालेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी झालेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर पोलिसांना एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या वाहनाचा अमळनेरपासून जळगावपर्यंत फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग केला. हे वाहन पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात पोहोचले असता, स्थानिक काही तरुणांनी देखील पोलिसांच्या मदतीसाठी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयित वाहन मास्टर कॉलनी परिसरात शिरल्यानंतर परिस्थिती चिघळली.वाहन अडवल्यानंतर संतप्त जमावाकडून परिसरात दगडफेक करण्यात आली. यात एका कारसह दोन दुचाकींची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. दरम्यान, पहाटेच्या वेळी घटनास्थळी राहून गेलेल्या आपल्या दुचाकी घेण्यासाठी सकाळी गेलेल्या दोन तरुणांवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला.

या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती शहरात पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शहरात आणि संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या