भुसावळ नगर पालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नाशिक विभागातील एकमेव
अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ नगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे ३७२ कोटी ३५ लाख ९४ हजार ६१४ रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत सादर करण्यात आला आहे.
सदरच्या सभेत दिड तास चर्चा चालली .
विशेष म्हणजे कोणतीही करवाढ न करता ३५ लाख ५८ हजार ४६१ रुपयांचा शिलकी अंदाज दर्शविणारा हा अर्थसंकल्प प्रशासनाने सविस्तरपणे मांडला.

सभेच्या अध्यक्षस्थानी लोक नियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले व लेखापाल अय्युब तडवी उपस्थित होते.
यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तसेच भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. वाढते विज बिल लक्षात घेता जल शुद्धीकरण केंद्रावर सोलर यंत्रणा बसविण्यात यावी या विशेष बाबीवर एकमत झाले .
भाजप गटनेते युवराज लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटनेते सचिन चौधरी, नगरसेवक संतोष चौधरी यांच्यासह किरन कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे व शोभा इंगळे यांनी चर्चे द्वारा मते मांडली.

काही ठिकाणी तांत्रिक त्रुट्या असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी निदर्शनास आणून होते
शहरातील पथदिवे दिवसभर सुरू राहण्याच्या समस्येवरही चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी पथदिव्यांचे ‘टायमर उलटे’ झाल्याचा संशय व्यक्त करत “रात्री दिवे बंद आणि दिवसा सुरू” अशी टिप्पणी केली.
या वेळी अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर धारेवर धरण्यात आले . कचरा समस्या, व व्यवस्थापन ,पाणी पुरवठा याबाबत या मुद्दयावर चर्चा करण्यात आली .
नगरसेविका प्राची पाटील व शोभा इंगळे यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल्याचे सांगितले. यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली.
तापी नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा सभेचा केंद्रबिंदू ठरला. युवराज लोणारी यांनी या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गटनेते सचिन चौधरी यांनी नदीपात्रात कासवांचे मृत्यू होणे धक्कादायक असल्याचे सांगितले .

