शिवजयंती निमित्त बाजारपेठ पोलीस ठाण्यात बैठक संपन्न
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ येथील भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले , पोलीस निरिक्षक राहुल वाघ , उपस्थित होते. त्यांनी मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करावे तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील सर्व मंडळांनी एकोप्याने आणि शांततेत शिवजयंती साजरी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीस पोलीस अधिकारी, कर्मचारी व विविध शिवजयंती मंडळांचे पदाधिकारी नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक बबलू बराटे,नगरसेवक मुकेश गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते गोलू कापडे कट्टर शिवसैनिक समर्थक नमा शर्मा उपस्थित होते.

