आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या उत्सवाची पाल येथे सांगता
भोंगर्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल.
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पाल ता रावेर दि ४/३/२०२६ होळी सणापूर्वी आठवडाभर चालणाऱ्या भोंगऱ्या बाजार उत्सवाची द सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पाल परिसरातील आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या उत्सवाची सांगता दि ३ मंगळवार रोजी पाल येथे करण्यात आली. या भोंगऱ्या बाजारात पारंपारिक वस्तू, , दाग दागिने, हार कंगन, व जीवनावश्यक वस्तू यांच्या खरेदी विक्रीमुळे पाल भोंगऱ्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
होळी सणापुर्वी आठवडाभरापासून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये आदिवासी बांधव हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.
या भोंगर्या बाजारात आदिवासी बांधवांचे पारंपारिक वेशभूषेत नृत्य, ढोल आणि थाळी या तालावर थिरकणारे युवक , लहान मुले मुख्य आकर्षण होते. यामुळे पाल घोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले.
शेवटच्या भोंगऱ्या बाजार असल्याकारणाने पालसह परिसरातील गारखेडा, निंमड्या, गारबर्डी ,पिंपळकुंड, सुखी धरण कॉलनी, गाडग्याआम,सतापिपरी,
शेंड्याअंजन, हरण कुंड्या,सातारी,खडक्यानदी, या गावातील तसेच मध्य प्रदेशातील असंख्य आदिवासी बांधवांनी या भोंगऱ्या बाजारात आपली उपस्थिती दाखवून या उत्सवाच्या मनसोक्त आनंद घेतला.
भोंगऱ्या बाजारात कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाल पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर , इस्माईल तडवी, व गृह रक्षक जवान यांच्या तर्फे चौक बंदोबस्त ठेवण्यात आला.
*छायाचित्र:- पाल ता रावेर भोंगऱ्या बाजारात पारंपारिक नृत्य करताना आदिवासी बांधव.

