Friday, March 6, 2026
Homeजळगावपिंपरी सेकम येथे खंडेराव महाराज यांचीयात्रा मोठ्या उत्साहात साजरी.

पिंपरी सेकम येथे खंडेराव महाराज यांचीयात्रा मोठ्या उत्साहात साजरी.

पिंपरी सेकम येथे खंडेराव महाराज यांचीयात्रा मोठ्या उत्साहात साजरी.
भुसाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि 6
येथून जवळ असलेल्या पिंपरी सेकम या ठिकाणी असलेल्या खंडेराव महाराज यांची होळी नंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेस सकाळी गावातील सर्व मंदिरात देव देवतांची पूजा करून सुरुवात मोठ्या उत्साहात केली जाते. या यात्रेत पिंपरी सेकम च्या जवळपास असलेल्या दिपनगर, निंभोरा बुद्रुक, कपिल वस्ती, फेकरी, तपत कठोरा, अंजनसोंडे, फुलगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत दाखल होत असतात. यात्रेत संध्याकाळी बारा गाड्या ओढल्या जातात. बारा गाड्या बघण्यासाठी गावकरी मोठी गर्दी करतात. लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, झुले, व विविध खेळण्याची दुकाने यात्रेत थाटली जातात. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे, महेश चौधरी, योगेश पालवे, मनोज येवलकर, किरण तायडे, तसेच गृह रक्षक दलाचे शंकर महाजन, कमलाकर महाजन, मंगल पाटील, किरण राजपूत, हर्षल अस्वार, कुलदीप चौधरी, सुरेखा इंगळे व उषा नरवाडे यांनी चोख बंदोबस्त राखला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या