वरणगाव परिसरात पळसाचा बहर
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता. भुसावळ : शहरासह परिसरात आणि उजनीचा दर्गा परिसरात सध्या पळसाच्या झाडांनी केशरी-तांबड्या फुलांचा बहर धारण केला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रखरखीत व कोरडे वातावरण जाणवत असताना या फुलांनी परिसराला वेगळीच रंगत दिली आहे. ठिकठिकाणी फुललेली पळसाची झाडे नागरिकांचे आणि प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. पानगळीनंतर संपूर्ण झाडावर फुलांचा बहर येत असल्याने पळस अधिक उठावदार दिसतो. दूरवरूनही झाडांवरची केशरी झाक नजरेत भरते. सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेत या फुलांचा देखावा अधिक खुलून दिसत असून अनेक नागरिक या पार्श्वभूमीवर छायाचित्रे काढताना दिसत आहेत.

