Friday, May 1, 2026
Homeजळगावतेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठक

तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठक

तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठक
भुसावळ खान्देश लाईव्ह प्रतिनिधी                 शहरातील सुरभीनगर येथील गणपती मंदिरात ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठकीचे आयोजन अरुण भास्कर धांडे यांच्या अध्यक्षतेखाली व राजेश नेहते यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.
बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजेश नेहते यांनी केले. दरम्यान, भुसावळ येथे २० मार्च २६ रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अनंतकोटी या नाट्य प्रयोगाचे आयोजनासाठी चर्चा करून नाट्यप्रयोग प्रचारपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या वसतिगृह बांधकाम करण्याकामी या नाटय प्रयोगाचे आयोजन असून आध्यात्मातून समाज सेवा घडणार असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी फाऊंडेशनचे सहयोगी सदस्य, कार्यकारिणी सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते बाबुराव भंगाळे, नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक शांताराम इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, धर्मराज देवकर, नितीन भंगाळे, तेजोदीप नवविचार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष राजेश नेहते, योगेश कोलते, संदीप राणे, दिलीप झांबरे, प्रा. धीरज पाटील, दिनेश कोलते, विनायक बेंडाळे, संतोष कोलते, किरण बळीराम पाटील, किरण जर्नादन पाटील, शिशिर भंगाळे, प्रणव पाटील, वसंत कोलते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या