Thursday, March 12, 2026
Homeजळगावभुसावळात मराठी भाषा गौरव संकल्पनेचा प्रारंभ

भुसावळात मराठी भाषा गौरव संकल्पनेचा प्रारंभ

भुसावळात मराठी भाषा गौरव संकल्पनेचा प्रारंभ

मराठी गौरव दिनानिमित्त नगराध्यक्ष गायत्री ताई भंगाळे यांचा पुढाकार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. स्वतःच्या गावात .स्वतःच्या वार्डात…
परदेशात साहित्यिक ,कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या घरासमोर गेटवर निळ्या रंगात जन्म मृत्यूची उल्लेख असलेली त्यांच्या नावाची पाटी लावली जाते. त्या वस्तूची हेरिटेज वास्तू म्हणून गणना केली जाते. ऐतिहासिक वारसा जतन केला जातो. या परदेशी संकल्पनेला स्वदेशी रूप देऊन मराठमोळ्या पद्धतीने भुसावळ येथे राबवली. त्याची सुरुवात मराठी भाषा गौरव पंधरवाडा व महिला दिना निमीत्त सुप्रसिद्ध साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला ही पाटी लावून शुभारंभ केला आहे . कार्यक्रमाचे संकल्पना आणि नियोजन समन्वयक प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले. यावेळी कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच ललीता चौधरी,सिमा भारंबे,सायली चौधरी,प्रा.उत्तम सुरवाडे,यांची उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत सांगवी येथील निवासस्थानाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, फैजपुर येथील कविवर्य भानू चौधरी यांच्या निवासस्थानाला. तसेच टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील साहित्यिकांपर्यंत ही चळवळ पोहोचवली जाईल.असा निर्धार भुसावळ येथील साहित्यिक बाबा साहेब के नारखेडे , मधुसाळी , नाट्य कलावंत श्रीकांत जोशी, विरेंद्र पाटील,राजेंद्र जावळे,जगदीश पाटील, काशीनाथ भारंबे, रमाकांत भालेराव यांच्या सह भुसावळ शहरातील इतर लेखक कलावंत यांच्या घरावर अशा पाट्या लावल्या जाणार आहे असा निर्धार प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केला आहे . हा एक मराठी भाषेचा गौरव असल्याचे बोलले जाते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या