Tuesday, March 17, 2026
Homeजळगावभुसावळ रेल्वे मंडळाचा नवा विक्रम; वेळापत्रक अचूकतेत १०० टक्के यश

भुसावळ रेल्वे मंडळाचा नवा विक्रम; वेळापत्रक अचूकतेत १०० टक्के यश

भुसावळ रेल्वे मंडळाचा नवा विक्रम; वेळापत्रक अचूकतेत १०० टक्के यश

१७३ पैकी सर्व रेल्वे वेळेवर; भारतीय रेल्वेच्या ६९ मंडळांमध्ये प्रथम क्रमांक

भुसावळ :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने रेल्वे वेळापत्रक अचूकतेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय रेल्वेच्या ६९ मंडळांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. १३ मार्च रोजी धावलेल्या १७३ पैकी सर्व रेल्वे वेळेवर पोहोचल्याने मंडळाने इतिहासात पहिल्यांदाच १०० टक्के वेळापत्रक अचूकता साधली आहे. यापूर्वीचा ९८.३२ टक्क्यांचा विक्रम मागे टाकत ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.

भुसावळ मंडळाच्या या यशामुळे मध्य रेल्वेने देशातील १७ झोनल रेल्वेमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. मार्च महिन्यात ३, ५, ११ आणि १३ मार्च रोजी मंडळाने चौथ्यांदा १०० टक्के वेळापत्रक अचूकता साधत सातत्यपूर्ण कामगिरीची नोंद केली आहे.

दररोज सरासरी १७० पेक्षा अधिक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे व्यवस्थापन करताना ही अचूकता साध्य करण्यात आली आहे. यामागे मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, ‘झीरो टॉलरन्स’ धोरण आणि उच्च कार्यसंस्कृतीचा मोठा वाटा असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, मध्य रेल्वेने आतापर्यंत एकूण ९२ टक्के वेळापत्रक अचूकता साधली असून यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि जलद सेवा मिळण्यास मदत होत आहे. रेल्वे प्रशासनाने या यशाला ऐतिहासिक कामगिरी म्हणून गौरविले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या