Tuesday, September 15, 2026
Homeकृषीवादळी वाऱ्यासह गारपीट; चाळीसगाव तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान

वादळी वाऱ्यासह गारपीट; चाळीसगाव तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान

वादळी वाऱ्यासह गारपीट; चाळीसगाव तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सणासुदीच्या काळातच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.तालुक्यातील दहिवद, राजमाने, खडकीसीम, चिंचगव्हाण, लोंढे, पिंजारपाडे, दरेगाव, धामणगाव या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, बाजरी, मका तसेच काढणीस आलेला गहू पूर्णपणे आडवा पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाल्याने आर्थिक फटका बसला असून, पिकांच्या नुकसानीमुळे हाती येणारा उत्पन्नाचा स्रोत कोलमडला आहे.या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांकडून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने त्वरीत पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या