तालुक्यात केळी पीक विमा घोटाळ्यात ५ ते ६ हजार शेतकऱ्यांची चौकशी होणार…
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१९
रावेर तालुक्यात केळी पीक विमा घोटाळा उघड झाल्याने यावल तालुक्यातील ५ ते ६ हजार शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी यावल तालुका
कृषी विभागातर्फे टेक्स मेसेज देण्यात आले असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यासह धनाड्य शेतकऱ्यांच्या वर्तुळात खळखळ उडाली आहे.
शेतकऱ्यांना प्राप्त झालेला टेक्स मेसेज बघितला असता त्यात नमूद करण्यात आले आहे की कृपया नोंद घ्यावी की पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (RWBCIS) रब्बी २०२५-२६ हंगामा अंतर्गत आपला विमा प्रस्ताव अर्ज सुदूर संवेदन तंत्रज्ञान (रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान) आधारित क्षेत्र पडताळणी केल्यानुसार विमा संरक्षित केळी पीक आढळून आलेले नसल्यामुळे आपला सदर प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.
जर ह्याबाबत आपले काही म्हणणे असेल तर आपण संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या पीकविमा प्रतिनिधीकडे आपले निवेदन दि.२७ मार्च २०२६ पर्यंत सादर करावे.अधिक माहिती साठी या संदर्भात आपणास आमच्या कार्यालयामार्फत लेखी पत्र पाठवण्यात आलेले आहे. धन्यवाद – AIC of India Ltd.

