डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मोबाइल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीकडून तब्बल १७० लिटर चोरीचे डिझेल जप्त केले.
जळगाव तालुक्यातील तरसोद येथील आसोदा रोडवरील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरवर ही घटना घडली होती. १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्याने टॉवरच्या जनरेटरचे नुकसान करून सुमारे १५ हजार ९३४ रुपयांचे १७० लिटर डिझेल लंपास केले होते. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने घटनास्थळावरील टॉवर डेटा, सीडीआर आणि एसआरडीच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे गोळा केले. विश्लेषणानंतर संशयाची सुई अकोला जिल्ह्यातील राणेगाव येथील मूळ रहिवासी व सध्या जळगावच्या पिंप्राळा भागात राहणाऱ्या श्याम सुभाष कुकडे (वय ३८) याच्याकडे वळली. लंपास केले होते. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने घटनास्थळावरील टॉवर डेटा, सीडीआर आणि एसआरडीच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे गोळा केले. विश्लेषणानंतर संशयाची सुई अकोला जिल्ह्यातील राणेगाव येथील मूळ रहिवासी व सध्या जळगावच्या पिंप्राळा भागात राहणाऱ्या श्याम सुभाष कुकडे (वय ३८) याच्याकडे वळली

