Sunday, March 22, 2026
Homeगुन्हासख्खा भाऊच ठरला वैरी ! संतपातून मोठ्या भावाकडून लहान भावाची दगडाने ठेचून...

सख्खा भाऊच ठरला वैरी ! संतपातून मोठ्या भावाकडून लहान भावाची दगडाने ठेचून हत्या

सख्खा भाऊच ठरला वैरी ! संतपातून मोठ्या भावाकडून लहान भावाची दगडाने ठेचून हत्या

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – आई-वडीलांसह घरातील सदस्यांना नाहक त्रास देत असल्याच्या संतपातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील (वय २३, रा. नारोद, ता. चोपडा) याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याच्याविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी सदर घटना नारोद-खरदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी अडावद पोलीस पोलिसांना सदर घटना कळवली. अडावद ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट चोपडा डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटना स्थळी भेट दिली. मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान पोलिसांनी मयत रोहन याच्याबद्दल माहिती काढली असता त्याचे कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले. आणि तोच धागा पकडत पोलिसांन तपासाची चक्रे फिरवली आणि घटनेच्या काही तासातच संशयितास अटक केली.

मयत रोहन हा नशेच्या आहारी गेल्यामुळे तो आई वडीलांसह भावाला शिवीगाळ करीत होता. नशेत तो दररोज घरातील सदस्यांसोबत वाद घाली होता. त्यामुळे दररोजच्या वादाला घरातील सर्वचजण कंटाळले होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता संशयित किरण याने लहान भाऊ रोहनला पाच हजार रुपये दिले होते, त्या पैशातून रोहन हा दारू पिला. त्यानंतर संधी साधत संशयित किरण याने गुळी नदीवरील केटीवेअरवरुन रोहनला ढकलून दिले. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर किरण याने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची निर्घण हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.रोहनच्या अंगावरील जखमांवरुन त्याचा घातपात झाल्याचा संशयित स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांना होता. ते पथकासह नारोद येथे पोहचल्यानंतर त्यांनी मयत रोहनचा मोठा भाऊ किरण याला चौकशीसाठी बोलावले. त्यांनी किरणच्या चेहऱ्याला झालेल्या जखमा बघून चौकशी केली असता, तो उडवाउडीची उत्तरे देत होता. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने लहान भावाच्या हत्येची कबुली दिली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या