शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तीव्र शब्दात निषेध

रमाकांत मोरे
सातारा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे जिल्हा परिषद निवडनुकी कड़े सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष , निवडी दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी यांना स्पष्ट बहुमत संख्या असतांना भारतीय जनता पार्टी यांनी कुटनीतीने दोन सदस्य यांच्यावरती प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून गुन्हा दाखल करून त्यांना मतदान करू दिले नाही तसेच या ठिकाणी झालेल्या झटापटीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभुराजे साहेब यांच्या हाताला दुखापत सुद्ध झाली या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उंब्रज विभाग व कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा युवा मंच( उंब्रज

विभाग)यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे . पालकमंत्री शंभुराजे देसाई साहेब यांच्या रक्ताच्या एकूण एक थेंबाची किंमत विरोधकांना चुकवावे लागेल असे संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या आहेत . याप्रसंगी सचिनभैय्या जाधव , दीपक भाऊ हजारे , युवा नेता व सामाजिक कार्यकर्ता योगेश भाऊ पोळ , रवींद्र जाधव , राहुल जाधव , गणेश हजारे , ओंकार भोसले , सचिन जाधव , प्रकाश बनसोडे , प्रथमेश लादे , विराज काकडे , अर्जुन यादव , आदित्य चौगुले , सुजल गडकरी राहुल आटोळे , गणराज पवार , ओमकार कांबळे , हर्षद जाधव संदेश बेळगावकर , उमेश बानमारे सहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या घटनेने पुन्हा शिवसेना व भाजपात वादाची ठिणगी पडली आहे .

