Friday, May 1, 2026
Homeजळगावरावेर येथे रमजान ईद उत्साहाने साजरी     

रावेर येथे रमजान ईद उत्साहाने साजरी     

रावेर येथे रमजान ईद उत्साहाने साजरी                   रावेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       इस्लाम धर्मातील पवित्र सणापैकी एक गोड ईद म्हणजेच ईद-उल-फित्र आज सनिवार रोजी शहर व रावेर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या . मुस्लिम अनुयायांनी आज रावेर येथे उटखेडा रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी 8 -30 वाजता येथे पोहोचून विशेष ईदची नमाज अदा केली. रावेर येथील जामा मशिदीचे इमाम मौलाना शोएब रझा यांनी ईदची नमाज पठण केली तालुक्यातील गावात ईदगाह आणी मशिदी मध्ये जमवून मुसलीम बांधवांनी ईद -उल-फित्र नमाज अदा केली आणी त्यांचे कुटूंब नातेवाईक आणी देशवासीयाकरिता सुख शांती आणी आनंदासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली यावेळी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून एकमेकांनी मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी ईदची शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर अप्पर जिल्हाधिकारी रावेर प्रशिक्षणार्थी तहसीलदार दिपा जेधे , पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल , माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद ‘ उपनगराध्यक्ष आसीफ मोहमंद , माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष शेठ गनवाणी , संतोष महाजन , समाजिक कार्यकर्ते मुन्ना अग्रवाल ,धोमा तायडे ,, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल , शेख ग्यास , युसूफ खान , जमाते इसलामी चे शफी सर ,सरफराज खान सर , आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस निरिक्षक डॉ . विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या