प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त ” रामरंग ” भजन संध्याचे आयोजन जळगाव/ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून रामनवमी निमित्त दि.२६ गुरुवार रोजी भव्य ” राम रंग: भक्तीचा आणि सुरांचा संगम या ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन संध्या जळगाव येथील प्रसिद्ध ” भक्तीनाद ” ग्रुप प्रस्तुत करणार आहेत..औद्योगिक वसाहत परिसरातील अयोध्यानगरमध्ये ‘रामरंग’: भक्ती आणि सुरांचा त्रिवेणी संगम रंगणार आहे.
हा कार्यक्रम भक्ती आणि संगीताची मेजवानी ठरणार आहे.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध भजन गायक पं. नारायणभाई ओझा आणि प्रसिद्ध गायिका भानूप्रियाजी आपल्या सुमधुर आवाजात रामभजने सादर करतील. कार्यक्रमाचे नेटके व हटके निवेदन कलावंत आणि प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे करणार आहेत.


उद्या दि.२६ मार्च २०२६ गुरुवार रोजी
संध्याकाळी ७ वाजता
राममंदिर मित्र मंडळ, अयोध्या नगर येथे हा स्वर सोहळा रंगणार आहे.
प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी आणि या सुश्राव्य भजन संध्येचा आनंद घेण्यासाठी सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रामजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी यंदा भक्ती संगीताच्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित भजने, अभंग आणि सुश्राव्य गीते याप्रसंगी सादर केली जाणार आहेत,असे कळविण्यात आले आहे.

