Wednesday, August 26, 2026
Homeजळगावआदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रस्थानी असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.या सोहळ्यात मंडळाच्या अध्यक्षपदी अश्विनी मुंदडा यांची निवड जाहीर करण्यात आली. त्या सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या केदारनाथ मुंदडा यांच्या सुन असून, त्यांच्या कुटुंबाची सामाजिक परंपरा लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.कार्यक्रमास मंडळाच्या संस्थापिका शीतल मंत्री, प्रमुख अतिथी केदारनाथ मुंदडा तसेच शहरातील विविध महिला मंडळांच्या अध्यक्षा व सचिव यांची विशेष उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या साक्षीने नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा पार पडला
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – अश्विनी मुंदडा
सचिव – सोनाली काबरा
उपाध्यक्ष – सुनंदा लाठी
कोषाध्यक्ष – मनीषा मणियार
पीआरओ – लीना काबरा
सल्लागार – आरती काबरा
कार्यकारिणी सदस्य : नेहा लाठी, सारिका कोगटा, पूनम मंत्री, मधु तापडिया, राणी लाहोटी, वैशाली मुंदडा, विमला करनानी, शर्मिला न्याती, सपना काबरा, नम्रता काबरा, सुलभा छापरवाल, स्मिता सोमाणी, दीप्ती झंवर आणि नीलिमा धुप्पड.
कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्पना काबरा व सुचिता सोनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूनम मंत्री यांनी मानले.
“मोर” थीमची आकर्षक सजावट हा कार्यक्रमाचा विशेष ठरला. तसेच स्वागत गीतावर भक्ती मुंदडा यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मनं जिंकली.उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. अशी माहिती पीआरओ लीना काबरा व निलेश प्रकाश अजमेरा यांनी प्रसिध्दीस दिली.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या