Monday, July 6, 2026
Homeचाळीसगावसायगाव येथे ट्रॅक्टर पलटी; चालकाचा दुर्दैवी मृत्यू

सायगाव येथे ट्रॅक्टर पलटी; चालकाचा दुर्दैवी मृत्यू

सायगाव येथे ट्रॅक्टर पलटी; चालकाचा दुर्दैवी मृत्यू

Oplus_131072

<img class

चाळीसगाव :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               तालुक्यातील सायगाव येथे दत्त मंदिरासमोर ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.काशिनाथ दादा भील (वय ३२, रा. मांदुर्णे ता. चाळीसगाव) हे २८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन जात असताना सायगाव येथील दत्त मंदिराजवळ ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच सायगाव ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले व उपचारासाठी मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी गुलाब किसन मोरे यांच्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या