Monday, July 6, 2026
Homeगुन्हाहिरापुर रोडवर घरफोडी; बंद घर फोडून 2.53 लाखांचा ऐवज लंपास

हिरापुर रोडवर घरफोडी; बंद घर फोडून 2.53 लाखांचा ऐवज लंपास

हिरापुर रोडवर घरफोडी; बंद घर फोडून 2.53 लाखांचा ऐवज लंपास
चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            शहरातील हिरापुर रोड परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे 2 लाख 53 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब देवराम जाधव (वय 62, रा. सुयश लॉन्सजवळ, हिरापुर रोड) हे आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीनिमित्त राहतो. जाधव दाम्पत्य 24 मार्च 2026 रोजी मुलाकडे पुण्यास गेले होते. घराला कुलूप लावून ते बाहेर पडले होते.दरम्यान, 30 मार्च रोजी सायंकाळी शेजारी धनराज गायकवाड यांनी जाधव यांना फोन करून घराचा दरवाजा वाऱ्यामुळे आपटत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलाने पाहणी केली असता दरवाज्याच्या कड्या तुटलेल्या असल्याचे आढळले. यानंतर नातेवाईकांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले.जाधव दाम्पत्य परतल्यानंतर सविस्तर तपासणी केली असता कपाटे फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. यात मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने, नथ, अंगठ्या तसेच चांदीच्या मूर्ती, चैन, पैंजण यांचा समावेश आहे. एकूण 75 ग्रॅम सोन्याचे व 43 भार चांदीचे दागिने तसेच 3,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,53,400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
ही चोरी 24 मार्चच्या रात्री 9 वाजेनंतर ते 30 मार्च सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटे फोडत चोरी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Oplus_131072

<img class

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या