तीन लाखांच्या केबल चोरीप्रकरणी साक्रीतील भंगार दुकानदार अटकेत

चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरीप्रकरणी साक्री येथील भंगार दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी धुळे जिल्ह्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत चोरीची केबल वायर साक्री येथील भंगार विक्रेत्यास विक्री केल्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी सुलतान नुरा शाह (रा. नुरानी मस्जिदजवळ, साक्री, जि. धुळे) याला ताब्यात घेतले.माहितीनुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते २० मार्च रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ८ हजार मीटर लांबीची पॉलीकॅब कंपनीची काळ्या रंगाची केबल वायर चोरी केली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी मच्छिंद्र भटू जाधव (वय २६) व प्रविण रविंद्र जाधव (वय २४, दोघे रा. पेरेजपूर, ता. साक्री) यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची केबल सुलतान शाह याला विकल्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल राजपूत, सहाय्यक फौजदार युवराज नाईक, कॉन्स्टेबल निवृत्ती चित्ते व बाळू बाविस्कर हे करत आहेत.

