Monday, July 6, 2026
Homeचाळीसगावमदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा

मदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा

मदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा
चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      शहरातील मदरसा नूरुल इस्लाम येथे दिनांक ४ एप्रिल रोजी पार पडलेल्या साखरपुडा कार्यक्रमातच निकाह विधी पूर्ण करून एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर चर्चेतून साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला.या सोहळ्यात अकदस अफरोज खान (कालू खान) व मुब्बशिरा शेख (मुश्ताक शेख गफ्फार यांची कन्या) यांचा निकाह संपन्न झाला. धार्मिक विधी हाफिज जावेद साहेब इशाती (इमाम, मस्जिद अबू हनीफा) व हाफिज अब्दुल अजीज साहेब (इमाम, मक्का मस्जिद) यांच्या उपस्थितीत पार पडले.विशेष म्हणजे, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच शरबत देऊन विवाह सोहळा उरकण्यात आला, ज्यामुळे हा आदर्श विवाह म्हणून उपस्थितांनी कौतुक केले.

Oplus_131072

<img class

 


या प्रसंगी पत्रकार माजी उपसरपंच मुराद पटेल, पत्रकार शरीफ मिर्झा, पत्रकार, अलीम सय्यद,जमील मास्टर, रहीम अब्दुल रहमान, शेख फारूक, हाफिज मुदस्सीर (सोयगाव), इमरान भाई (सूरत), अकील बेग (धुळे), करीम सैय्यद, कलीम भाई, अमजद भाई, रहीम भाई, शहबाज शेख, शकील शेख यांच्यासह दोन्ही कुटुंबातील नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते.
महागाईच्या काळात खर्चिक विवाहांना पर्याय म्हणून साधेपणाने पार पडलेला हा निकाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या