Sunday, April 5, 2026
Homeचाळीसगावजामडी शिवारात चोरलेली कार उलटली चोरटे पसार

जामडी शिवारात चोरलेली कार उलटली चोरटे पसार

जामडी शिवारात चोरलेली कार उलटली चोरटे पसार

चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            तालुक्यातील जामडी शिवारात शेतातून चोरलेली चारचाकी कार पळवून नेत असताना नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर चोरट्यांनी वाहन जागेवरच सोडून पळ काढल्याचे उघड झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जामडी येथील शेतकरी इंदल परदेशी यांनी आपली एमएच ४० एआर २९४० क्रमांकाची कार शेतातील घराजवळ उभी केली होती. दरम्यान, सकाळी शेतात गेल्यानंतर कार जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता नागद शिवारातील सायगव्हाण रस्त्यावर बाभळीच्या झाडाला धडकून कार उलटलेल्या अवस्थेत आढळून आली.प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कार चोरून भरधाव वेगाने पळ काढला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने वाहन झाडावर आदळून उलटले. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, तालुक्यात अलीकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या