Tuesday, April 7, 2026
Homeचाळीसगावसोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टवर पोलिसांची तत्पर कारवाई; चाळीसगाव शहर पोलिसांचे कौतुक

सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टवर पोलिसांची तत्पर कारवाई; चाळीसगाव शहर पोलिसांचे कौतुक

सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टवर पोलिसांची तत्पर कारवाई; चाळीसगाव शहर पोलिसांचे कौतुक

चाळीसगाव —  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            सध्या सोशल मीडियावरील विविध रिल्स व व्हिडिओमुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत एक संवेदनशील प्रकरण प्रभावीपणे हाताळले.अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये “चाळीसगावचा मी मालक” असा आशय व्यक्त केल्याने शहरात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.या कारवाईत शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी संयमाने व जबाबदारीने ही कारवाई पार पाडली.दरम्यान, संबंधित तरुणाने आपल्या कृत्याबद्दल लेखी माफीनामा सादर केला असून भविष्यात अशा प्रकारची चूक न करण्याचे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह संपूर्ण पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.चाळीसगाव शहर पोलीस दल सध्या अत्यंत सतर्क असून शहरातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच सामाजिक शांतता टिकविण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
नागरिकांमध्येही पोलिसांच्या या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत असून, “चाळीसगाव पोलिसांची तत्परता व प्रभावी कारवाई ही शहरासाठी दिलासादायक आहे,” अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या