Friday, May 1, 2026
Homeजळगावन्यु व्यास नगर मध्ये आज पासुन भव्य दिव्य सांगितमय श्रीमद भागवत कथा...

न्यु व्यास नगर मध्ये आज पासुन भव्य दिव्य सांगितमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा

न्यु व्यास नगर मध्ये आज पासुन भव्य दिव्य सांगितमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            दि.६
यावल शहरातील न्यु व्यास नगर मध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिरासमोर राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज धानोरकर यांच्या प्रेरणेने व न्यु व्यास नगर मधील ग्रामस्थाच्या सहकार्याने भव्य दिव्य संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळा मंगळवार दि. ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे
या कालावधीमध्ये असा होईल कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८.०० ते १०.०० श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या कथेचे प्रवक्ते राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प गजानन महाराज धानोरेकर वाल्मीक आश्रम चिंचखेडा जामनेर हे लाभले असून
त्यांच्या सोबत साथ संगत म्हणून तबला वादक वाल्मीक महाराज मलकापूर, ऑर्गन वादक भागवत महाराज तेल्हारा, गायनाचार्य समाधान महाराज धानोरेकर व दीपक महाराज , हे राहतील काल्याचे किर्तन ह भ प राष्ट्रीय कीर्तनकार व कथा प्रवक्ते गजानन महाराज धानोरेकर यांचे १४ एप्रिल रोजी काल्याचे किर्तन होईल दिनाक १४ रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिनांक १४ एप्रिल रोजी महाप्रसाद दुपारी १२ ते ४ या वेळेत होईल या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन न्यू व्यास नगर मधील भाविक भक्तांनी केले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या