Monday, July 6, 2026
Homeगुन्हातालुक्यातील जुनपाणी येथे मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तालुक्यातील जुनपाणी येथे मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तालुक्यातील जुनपाणी येथे मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             तालुक्यातील जुनपाणी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका मजूरावर कु-हाड व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन दिलीप ढोणे (वय 32, रा. जुनपाणी, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर अंगणात हा प्रकार घडला. आरोपींच्या घरासमोरील उकिरडा उचलण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.या वादातून आरोपी योगेश गोरख ढाणे याने फिर्यादीवर कु-हाडीने हल्ला केला. फिर्यादीने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटाला दुखापत झाली. त्यानंतर जखमी फिर्यादीस कुटुंबीयांनी चाळीसगाव येथे उपचारासाठी नेत असताना चुतुर्भुज तांडा गावाजवळ पुन्हा आरोपी भेटले.या वेळी आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली तसेच भरत गोरख ढाणे, गौरव योगेश ढाणे आणि विजय भरत ढोणे यांनी काठ्यांनी मारहाण करत फिर्यादीच्या पाठीवर, मांडीवर व हातावर दुखापत केली.
या प्रकरणी योगेश गोरख ढाणे, भरत गोरख ढाणे, गौरव योगेश ढाणे व विजय भरत ढोणे (सर्व रा. जुनपाणी, ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oplus_131072

<img class

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या