२ महिला सरपंच व ३ ग्रामसेवकांवर कार्यवाही काय होणार..?
खंडाळा ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्षवेधून.
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनीधी – भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत मध्ये गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला असल्याने संबंधित २ महिला सरपंच व ३ ग्रामसेवक यांच्यावर पुढील कार्यवाही काय होणार..? याकडे संपूर्ण भुसावळ तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तत्कालीन महिला सरपंच पती व विद्यमान महिला सरपंच यांचा मुलगा वायरमन यांनी एक व्यक्ती व दोन नावे ( नितीन पाटील व शशिकांत पाटील दोघे नावे पेमेंट एकाच व्यक्तीची असलेले ) खंडाळा ग्रामपंचायत मध्ये दाखवून बऱ्याच वेळा ग्रामपंचायतचे चेक / धनादेश परस्पर वटवले असून यात गावातील दोन महिला सरपंच व तीन ग्रामसेवक यांचे संगणमत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.खंडाळा ग्रामपंचायत कामकाजाची चौकशी व्हावी व गैरव्यवहार व भ्रष्टाचार अनियमितपणा बाहेर यावा म्हणून जळगाव येथील कैलास देवराम पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) यांच्या कडे लेखी तक्रारी अर्ज केला होता. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांनी यावलचे विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी समिती नेमलेली होती. चौकशी समितीने आपला चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) यांच्याकडे दिला.या चौकशी अहवालात एक पाटील नामक सरपंच,तत्कालीन एक सरपंच, ( सासू – सुना ) तसेच तत्कालीन ग्रामसेवक राहुल तायडे, तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर, आणि तात्कालीन ग्रामसेविका सरला कोळी अश्या पाच जणांनी खंडाळा ग्रामपंचायत मध्ये अनियमितपणा गैरकारभार व भ्रष्टाचार केल्याचे आढळून आहे. त्यात विद्यमान महिला सरपंच मीराबाई पाटील यांचा मुलगा व तात्कालीन सरपंच वैशाली पाटील यांचे पती वायरमन नितिन प्रकाश पाटील,शशिकांत प्रकाश पाटील ( एकच व्यक्ती आणि दोन नावावर उलाढाल ) यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतचे धनादेश वेगवेगळ्या बँक दारे अनामत रक्कम म्हणून परस्पर वटवले आहे.ग्रामनिधी, तसेच इतर निधी मध्ये पण चौकशी अधिकारी यांनी चौकशीच्या वेळी अनामात रजिस्टर मागणी केली असता चौकशी कामी रजिस्टर उपलब्ध करून दिले नसल्याने सदर अनामत रकमेची नमुना नंबर ७ ची पावती चौकशी वेळी उपलब्ध न करून दिल्याने त्यामुळे खंडाळा ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि संदर्भ क्रा. ३ चे पत्रानुसार आपले विरुद्ध पुढील प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर का करण्यात येऊ नये ? असे चौकशी अधिकारी यांनी ठपका ठेवला असून हा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प ) यांना सोपवला आहे.त्यात आता भुसावळ गट विकास अधिकारी यांनी लागलीस खंडाळा ग्रामपंचायतच्या दोन महिला सरपंच व तीन ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सदर नोटीसीत दिलेल्या मुदतीत तीन दिवसाच्या आत आपला समर्पक खुलासा आवश्यक त्या कागदपत्रासह प्राप्त न झाल्यास तसेच समाधानकारक नसल्यास आपल्या विरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव जि.प.जळगाव कार्यलयास सादर करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी असे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या नोटीस मध्ये नमूद केले आहे.
या खंडाळा ग्रामपंचायत मधे एवढा मोठा प्राणावर भ्रष्टाचार व गैर कारभार झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणातील संबंधित दोन महिला सरपंच व तीन ग्रामसेवक यांच्या वरती पुढील कार्यवाही काय होणार..? याकडे खंडाळा ग्रामपंचायत मध्ये विकास कामे करणाऱ्या काही आजी-माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसह संपूर्ण भुसावल तालुक्याचे लक्षण आहे.