Saturday, April 11, 2026
Homeजळगावमौल्यवान पुस्तके रद्दीत विकू नका गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. नगरसेवक सागर...

मौल्यवान पुस्तके रद्दीत विकू नका गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. नगरसेवक सागर चौधरी यांचे नम्र निवेदन.

मौल्यवान पुस्तके रद्दीत विकू नका
गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. नगरसेवक सागर चौधरी यांचे नम्र निवेदन.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि.८
सर्व विद्यार्थ्यांच्या शालेय परिक्षा आता संपत आल्या आहेत.महाग दरात खरेदी केलेली पुस्तके २० रुपये किलो दराने रद्दीत विक्री करू नका.तुमच्या जवळ जी काही पुस्तके आहेत त्यांची यादी तुम्ही कोणत्याही व्हाट्सअप ग्रुप मध्ये टाका म्हणजे ती पुस्तके तुमच्या ओळखीच्या गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील गरजूंना त्यामुळे त्यांच्या पालकांना होणारा शैक्षणिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होईल आणि नकळत निसर्गाचे संवर्धन होईल.
१०००/- ची पुस्तके रु ५०/- च्या रद्दीत विकली गेली तर समजा आपण शिक्षित होऊन सुद्धा अशिक्षित आहोत आपल्या हाताने एखाद्या गरीब गरजू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना मदत होऊ शकते. त्यामुळे मौल्यवान शैक्षणिक पुस्तके रब्बीत विकू नका असे सामाजिक हिताचे नम्र निवेदन सामाजिक हितासाठी यावल नगरपरिषद सदस्य सागर चौधरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या