Friday, April 17, 2026
Homeजळगावसंतोषभाऊ चौधरी : भुसावळच्या विकासाचा पुन्हा घेतलेला ध्यास (भाग १)

संतोषभाऊ चौधरी : भुसावळच्या विकासाचा पुन्हा घेतलेला ध्यास (भाग १)

संतोषभाऊ चौधरी : भुसावळच्या विकासाचा पुन्हा घेतलेला ध्यास !

भुसावळ संतोष शेलोडे, संपादक खान्देश लाईव्ह न्यूज – शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत एक ठाम, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून माजी आमदार तथा स्वीकृत नगरसेवक संतोषभाऊ चौधरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पूर्वी घेतलेली मेहनत आणि राबवलेले उपक्रम आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी भुसावळच्या विकासाचा ध्यास घेतल्याने शहराच्या राजकारणात आणि प्रशासनात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यामध्ये संतोषभाऊ चौधरी आणि अनिल चौधरी यांचा सिंहाचा वाटा राहिला. निवडणुकीदरम्यान त्यांनी केलेली रणनीती, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क यामुळेच हा विजय शक्य झाला, असे राजकीय जाणकार मानतात.
विशेष म्हणजे, शहरात भाजपची मजबूत संघटना आणि प्रभाव असूनही मंत्री सावकारे यांच्या सुविद्य पत्नीस पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल भुसावळच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांचे प्रतीक मानला जात आहे. यामध्ये चौधरी कुटुंबाचे योगदान निर्णायक ठरले आहे.
सुमारे नऊ वर्षांनंतर संतोषभाऊ चौधरी आणि त्यांचे सुपुत्र सचिन चौधरी हे दोघेही पुन्हा सक्रिय राजकारणात ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांनी गायत्री भंगाळे यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना राजकीय बळ दिले आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे २७ भाजप नगरसेवकांच्या विरोधातही नगराध्यक्षा सक्षमपणे आपली भूमिका मांडू शकत आहेत.संतोषभाऊ चौधरी यांच्याकडे स्पष्ट विकासाचा अजेंडा आहे. यापूर्वी त्यांनी भुसावळ शहरातील अनेक भागांचा कायापालट केला. गल्ली-बोळांमध्ये अडकलेल्या शहराला त्यांनी नियोजनबद्ध विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांवर त्यांनी विशेष भर दिला होता.
आता पुन्हा एकदा तेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून संतोषभाऊ चौधरी भुसावळला अधिक आधुनिक, सुबक आणि नाविन्यपूर्ण शहर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा शहराला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
(क्रमशः पुढील भागात – संतोषभाऊ चौधरी यांच्या विकास आराखड्याचा सविस्तर आढावा…)
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या