Thursday, April 9, 2026
Homeजळगावपुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ !

पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ !

पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवडाभराच्या शांततेनंतर पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या पुढे गेला, तर चांदीनेही प्रतिकिलो अडीच लाखांचा टप्पा ओलांडला.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या दरवाढीस चालना मिळाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विशेषतः अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात चढ-उतार दिसून आले. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला. दरम्यान, सकाळी वाढलेले दर सायंकाळपर्यंत किंचित घसरले असले, तरी एकूणच भाव उच्च पातळीवरच कायम आहेत. त्यामुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना ऐनवेळी आपले आर्थिक नियोजन बदलावे लागत आहे. येथील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी २०६ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५३ हजार ९८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. तर मंगळवारी दिवसभरात १३०९ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ६७६ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, बुधवारी दि. ८ रोजी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सकाळी ५१२० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५७ हजार ७९६ रुपयांपर्यंत वधारले. त्यात दुपारी ८२४ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह १० ग्रॅम १ लाख ५६ हजार ९७२ रुपये होते. पुन्हा सायंकाळी बाजार बंद झाले. त्यावेळी १४४२ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह १० ग्रॅम १ लाख ५५ हजार ५३० रुपये होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या