Thursday, April 9, 2026
Homeजळगावपोलीस अधीक्षकांनी दिली सहाय्यक फौजदाराला कारणे दाखवा नोटीस.

पोलीस अधीक्षकांनी दिली सहाय्यक फौजदाराला कारणे दाखवा नोटीस.

पोलीस अधीक्षकांनी दिली सहाय्यक फौजदाराला कारणे दाखवा नोटीस.

वेतन वाढ दोन वर्षाकरिता रोखणार…

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     पुढील देय वार्षिक वेतन वाढ दोन वर्षाकरिता ( अपरिणाम कारक ) का रोखण्यात येऊ नये या शिक्षेची कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक फौजदार यांना दिल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी सहाय्यक फौजदार अतुल रघुनाथ वंजारी नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिलेल्या अंतिम आदेशात नमूद केले आहे की कसुरी बाबत पुढील देय वार्षिक वेतनवाढ दोन (०२) वर्षाकरीता (अपरिणाम कारक) का रोखण्यात येऊ नये ?” या शिक्षेची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत संक्षिप्त विवरण असे की
अत्यंत वेशिस्त व बेजबाबदार पणाचे वर्तन जे की,सफौ / १४२८ अतुल रघुनाथ वंजारी तुम्ही स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे नेमणुकीस असुन अर्जदार संजय रामभाऊ वराडे, रा.चिंचोली ता. जि.जळगांव यांचे अल्युमिनी
अमच्या तारा चोरी झाल्या प्रकरणात त्यांचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी CCTNS गुरनं ५९ / २०२४ भादवी कलम ३७९ प्रमाणे व दिनांक २१/०६/२०२४ रोजी
CCTNS गुरनं ३९२/२०२४ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल होता.सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास हा पोहवा / ७० रामकृष्ण पाटील यांचेकडे होता.नमुद दोन्ही गुन्ह्यात आरोपीताचा शोध न लागल्यामुळे फिर्यादी यांचे
विनंतीवरुन सदरचे दोन्ही गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा जळगांव येथे वर्ग करण्यात आलेले होते. अजंदार संजय रामभाऊ वराडे यांनी त्यांचेकडील झालेल्या चोरी प्रकरणात तुमचंकडे SDR/CDR बाबत कोणतीही मागणी केली नसतांना तसंच तपासी अधिकारी किंवा प्रभारी अधिकारी यांनी समांतर तपास अथवा तपासात मदत करण्याबाबत कुठलेही आदेश दिले नसतांना तुम्ही पोलीस विभागासाठी आरोपीचा शोध घेणेकामी असलेले शासकीय तलाश ॲप वरून फिर्यादी तथा अर्जदार यांना गुन्ह्यासंबंधाचे माहिती परस्पर पाठविलेली आहे. तुम्ही एमआयडीसी पोस्टेला गुन्हे शोध पथकांत असतांना तुमचेकडे तलाश ॲपचे ॲक्सेस होते. परंतु सदर गुन्ह्यात तुम्ही कोणत्याही वरीष्ट अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता तलाश अँपची माहिती (SDR/CDR) फियांदी
यांना दिली आहे.
तुम्ही एक जबाबदार पोलीस अंमलदार असून तुम्हास पोलीस खात्याच्या नियमाची पूर्णपणे जाणीव असताना देखील तुम्ही तुमच्या कर्तव्यात गैरशिस्त वर्तन केले आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे
अंतिम आदेश :-पोलीस अधीक्षक,जळगांव महाराष्ट्र
पोलीस नियमावली-१९९९ भाग-१ नियम क्रमांक ४३८ (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) १९५६
मधील तरतुदीनुसार सफौ/१४२८ अतुल रघुनाय बंजारी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना उक्त कसुरोत जबाबदार धरून “पुढील देय बार्षिक वेतनवाढ दोन (०२) वर्षाकरीता (अपरिणामकारक) रोखणे” ही
राहील.शिक्षा देण्यात येत आहे. सदर शिक्षेचा कालावधी हा किरकोळ रजा खेरीज सर्व प्रकारच्या रजा वगळुन सदर शिक्षेची अंमलबजावणी प्रचलित नियमानुसार करण्यात यावी.
कसुरदार हे सदर शिक्षा आदेशाने व्यथीत होत असल्यास सदरील शिक्षा आदेशा विरुद्ध आदेश
बजविल्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत आवश्यक दस्तऐवजांच्या छायांकित प्रतीसह या कार्यालयाच्या मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांना अपील अर्ज सादर करु शकतात. असे दिलेल्या अंतिम आदेशात पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या