आदिवासी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याने प्रभावशाली समाजाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपी अटक.

पोलीस पाटलाच्या कामकाजावर संशय.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.९
एका प्रभाव संपन्न समाजातील एका मुलाने आदिवासी अल्पवयीन मुलगी आहे असे माहीत असताना तिचा गेल्या ४ महिन्यापासून पाठलाग करून तिला मोबाईल फोन देऊन तिला वारंवार फोन करून त्रास देऊन दि.२४ मार्च २०२६ रोजी सकाळी त्या मुलीला फूस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या आदिवासी वडिलांने फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी करीत आहे.गुन्हा दाखल करून आरोपी अटक झाली असली तरी या प्रकरणात संबंधित पोलीस पाटलाने काही महिन्यापूर्वी केलेल्या मध्यस्थी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोमवार दि.२४ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता आम्ही शेतात कामासाठी गेलो होतो माझी मुलगी घरी एकटीच होती आम्ही पुन्हा शेतातून भाकर खाण्यासाठी सकाळी १० वाजता घरी परत आलो तेव्हा घरात मुलगी दिसून आली नाही म्हणून आम्ही तिचा शोध गावात व परिसरात घेतला परंतु ती मिळून आली नाही. तिचा शोध घेत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावातील पोलीस पाटील यांनी फोन करून सांगितले की तुझी मुलगी जळगाव येथील शासकीय बालगृहात जमा केली आहे. तू उद्या तेथे जाऊन तिला घेऊन ये.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२५ मार्च २०२६ रोजी पीडित आदिवासी अल्पवयीन मुलीचे आई-वडील आपल्या पिडित मुलीला घेण्यासाठी जळगाव बालकल्याण समिती येथे गेले असता तिची चौकशी सुरू असल्याने तेथील अधिकारी यांनी तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले नाही.पुन्हा ६ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील बालगृहात गेलो असता त्यांनी मुलगी ताब्यात दिली नाही. तेव्हा मुली सोबत बोलणी झाली तिने सांगितले की मला दि.२४ मार्च २०२६ रोजी त्या मुलाने घरातून नेऊन त्याच्या नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला असता त्याच्या नातेवाईकाने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे नेऊन सोडले. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी मला बालगृहात जमा केले. आता मला तुमच्या सोबत घरी यायचे आहे असे आई-वडिलांना सांगितले. असले तरी अजूनही मुलगी बालगृहात जमा आहे.
तरी माझ्या ओळखीच्या मुलाने आदिवासी अल्पवयीन मुलगी असल्याचे माहित असताना सुद्धा पळून नेल्याने फिर्यादीला वरून पोलीस स्टेशनला गु.र.नं. १०६ /२०२६ CCINS भा.न्या. सं. कलम १३७ ( २ ) ७८ बालकांचे लैंगिक अपराधांपासून अधिनियम २०१२ चे कलम ११ (iv), १२ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कलम ३ ( २ ) ( ५८ ) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आरोपीस भुसावल न्यायालयात हजर केले परंतु आरोपीला न्यायालयीन /किंवा पोलीस कोठडी आहे किंवा कसे याबाबतची माहिती मिळालेली नसली तरी उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून पुढील तपास करीत आहे.
पोलीस पाटलाची भूमिका / मध्यस्थी संशयास्पद – दिलेल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार गेल्या ४ महिन्यापूर्वी या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे आणि मुलाचे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत आले होते त्यावेळी पोलीस पाटलाने गावातील वस्तुस्थिती लपवून पोलिसाची दिशाभूल करून प्रकरण मिटविले होते. त्या वेळेला पोलीस पाटलाने आर्थिक व्यवहार न करता कायदेशीर कार्यवाही केली असती तर अल्पवयीन मुलगी जळगाव बालकल्याण समितीकडे गेली नसती आणि तिच्यावर अशी वाईट वेळ आली नसती अशी चर्चा आहे.

