आज यावल व्यासनगरीत विराट हिंदू संमेलन …

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१०
शनिवार दि.११ रोजी संध्याकाळी ५ वाजता यावल व्यासनगरीत भुसावळ रोडला लागून असलेल्या स्वामीनारायण मंदिरासमोर श्री बालाजी मंदिर पटांगणावर विराट हिंदू संमेनलन वक्ते – श्री गौतमजी खट्टर यांच्या खास उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व समाजातील नागरिकांनी, सकल हिंदू समाजाने सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज समितीकडून आव्हान करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सनातन महासंघाचे संस्थापक श्री.डॉ . गौतमजी खट्टर व जळगाव जिल्हा विभाग प्रमुख श्री.स्वप्निलजी शशिकांत चौधरी तसेच मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.जळकेकर महाराज व श्री.स्वामी ब्रह्मानंद श्री दत्त गिरणारी मठ भुसावळ हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात सकल हिंदू समाजात एकता,
सामाजिक बंधुता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात,भाषा आणि पंथ याचा भेदभाव विसरून एकत्रीकरणाच्या मुख्य उद्देशाने व सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी श्री . महर्षी व्यासनगरीत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे.
तरी परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी सहपरिवार सह उपस्थित राहून धर्म सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजक -सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेले आहे .

