भुसावळ शहराच्या विकासाचे शिल्पकार संतोष भाऊच !
भुसावळ संतोष शेलोडे, संपादक खान्देश लाईव्ह न्यूज – भुसावळ शहराचे शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते, ते म्हणजे संतोष भाऊ चौधरी. शहराच्या विकासाबाबत अनेक नेते दावे करतात, मात्र भुसखेड्यासारख्या अवस्थेतून भुसावळ शहर उभे करण्याचे खरे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल, तर ते निडर आणि दूरदृष्टी असलेल्या संतोष चौधरी यांनाच द्यावे लागेल.
संतोष भाऊ चौधरी यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर समाजातील सर्व जाती-धर्मियांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही केले. त्यांच्या दारात कामासाठी येणारा कोणताही नागरिक निराश परत जात नाही, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. लोकांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि समस्यांवर तत्पर उपाय ही त्यांची खासियत ठरली आहे.अनेक वर्षांपासून चालत आलेली राजकारणातील मक्तेदारी मोडून काढण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. त्यांच्या कार्यकाळात भुसावळ शहराचा चारही बाजूंनी विस्तार झाला, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा आणि नवीन विकासकामांची गती यामुळे भुसावळने एक नवे रूप धारण केले.
नेतृत्व घडविण्याची ताकदही संतोष भाऊंमध्ये आहे. आज मंत्रीपदावर कार्यरत असलेले संजय सावकारे हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेते आहेत. ते आता दुसऱ्या पक्षात आहेत हा विषय वेगळा.आणि चौधरी बंधुना विरोधक समजतात तो राजकारणातला भाग आहे पण सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आता पुढील पिढीला संधी देण्याच्या त्यांच्या धोरणातूनच गायत्री भंगाळे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभागृहात त्यांना सक्षमपणे काम करण्याची ताकद संतोष भाऊंच्या पाठबळामुळेच मिळत आहे.त्यांच्या कुटुंबातील पुढची पिढीही राजकारणात सक्रिय आहे. त्यांचे पुत्र सचिन चौधरी हे नगरपालिकेचे सदस्य असून, येणाऱ्या काळात त्यांच्या दोन्ही मुलांनी सभागृहात प्रतिनिधित्व करावे, अशी विकासाची पेरणी ते करत आहेत.
अशा प्रकारे विकासाची दूरदृष्टी, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि नेतृत्व घडविण्याची क्षमता यामुळे संतोष भाऊ चौधरी यांच्यासारखा नेता भुसावळकरांना लाभणे, हे खरोखरच शहराचे भाग्य म्हणावे लागेल.